प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महत्वाची माहिती; कधी होणार बदल्या? जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यात आजच्या स्थितीही शाळा सुरु करण्यात आलेल्या नाही आहे. यामुळे प्राथमिक शाळा प्रत्यक्षात सुरू होवू शकलेल्या नाहीत.

याच अनुषंगाने प्राथमिक शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात विचार करण्यात येणार असल्याचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काढले आहेत. यामुळे शिक्षकांच्या बदल्या काही काळासाठी तरी पुढे ढकलल्या आहेत.

दरम्यान राज्यात अनेक विभागांच्या बदलाचे सत्र सुरु आहे. यातच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या देखील काही दिवसांपुरीच बदल्या झाल्या आहेत. तसेच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहे.

दरम्यान ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढलेले आहेत. या आदेशात ग्रामविकास विभागाच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या बदल्या या 14 मे 2014 च्या शासन निर्णयानूसार,

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 9 जुलै 2012 च्या शासन निर्णयानूसार दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यास करण्यास सांगण्यात आले होते.

मात्र, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या 29 जुलै 2021 शासन निर्णयानूसार करण्यात आल्या. दुसरीकडे राज्यातील करोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू होवू शकलेल्या नाहीत. यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा निर्णय हा शाळा सुरू झाल्यानंतर घेण्यात येईल, असे कळविले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24