अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे.
पालकमंत्री मुश्रीफ हे आज जिल्हा दौया-वर आले होते त्यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी ना़ प्राजक्त तनपुरे,
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,एसपी मनोज पाटील,आ. निलेश लंके,आ.संग्राम जगताप, आ. रोहीत पवार उपस्थित होते़