महत्वाची बातमी ! सप्टेंबर महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सप्टेंबर 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. या महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण, उत्सव असल्यामुळे बँका जवळपास 12 दिवस बंद राहणार आहेत.

या सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या लिस्ट नुसार सप्टेंबरमध्ये एकूण 7 बँकेच्या सुट्या असतील. तसे तर सुट्या संपूर्ण भारतात एकसाऱख्या असतात. परंतु काही राज्यांमध्ये विशेष सुट्या असतात.

त्याशिवाय सप्टेंबरमध्ये 6 साप्ताहिक सुट्या असतील. बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना सुट्टींचा असणार आहे. बँक कर्मचारी सप्टेंबर महिन्यात 12 सुट्यांचा आनंद घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम किंवा बँकेतून मोठी रक्कम काढायची असेल त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.

सप्टेंबर महिन्यातील सुट्यांची यादी :

-5 सप्टेंबर- रविवार
– 8 सप्टेंबर – प्रकाश उत्सव श्री गुरु ग्रंथ साहेब जी. पंजाबमध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. (स्थानिक सुट्टी)
– 9 सप्टेंबर- सुहाग पर्व तीज (स्थानिक सुट्टी)
-10 सप्टेंबर- गणेश चतुर्थी (स्थानिक सुट्टी)
-11 सप्टेंबर- महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील.
-12 सप्टेंबर- रविवार
-17 सप्टेंबर- कर्मा पूजा (स्थानिक सुट्टी)
19 सप्टेंबर- रविवार
-20 सप्टेंबर- इंद्र जत्रा (स्थानिक सुट्टी)
-21 सप्टेंबर- नारायण गुरु समाधी दिवस (स्थानिक सुट्टी)
-25 सप्टेंबर- महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
-26 सप्टेंबर- रविवार

आजपासून सलग चार दिवस बँका बंद :-

आजपासून बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. आता बँका थेट 1 सप्टेंबरला उघडतील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या सणांमुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. यापैकी आज चौथा शनिवारी आणि उद्या रविवार असल्यामुळे बँका बंद असतील. तर गोकुळाष्टमी असल्याने 30 आणि 31 तारखेला देशाच्या विविध भागांत बँका बंद राहतील.

ATM मशीनमध्ये पैशांचा खडखडाट :-

सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे बँकांच्या ATM मशीनमध्ये पैशांचा खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना निर्बंधांमुळे लोक बँकेत जाणेही टाळत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24