ATM Cash withdrawal guideline : एसबीआय देशातील सर्वात आघडीची बँक आहे. या बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
त्यामुळे ग्राहकांनी एटीएममध्ये जाण्यापूर्वी ही मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत याची माहिती घ्यावी नाहीतर त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. मार्गदर्शक तत्त्वे नेमकी काय आहेत, जाणून घेऊयात.
SBI ची OTP आधारित ATM सुविधा कशी काम करेल?
एसबीआयचे ग्राहक प्रत्येक वेळी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी त्यांच्या डेबिट कार्ड पिनसह एंटर करून त्यांच्या एटीएममधून रु. 10,000 आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यासाठी या सुविधेचा वापर करू शकतात. ही सुविधा 1 जानेवारी 2020 पासून सुरू आहे.
SBI ने 26 डिसेंबर 2019 रोजी Twitter वर घोषणा केली होती की ही सुविधा 1 जानेवारी 2020 पासून सर्व SBI ATM वर लागू होईल. असे म्हटले होते की, ‘एटीएममधील अनधिकृत व्यवहारांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी OTP-आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही नवीन सुरक्षा प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून सर्व SBI ATM वर लागू होईल.
ही संपूर्ण प्रक्रिया आहे
यासाठी तुम्हाला एक ओटीपी लागेल, त्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकणार नाही.