अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- मार्च एंड असल्यामुळे पुढील सलग आठ दिवस बँकाचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे बाजारात पैशांची चणचण भासणार असल्याने पुढील आठ दिवसांसाठी नेप्ती उपबाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कळवण्यात आले आहे.
त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी न आनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवा असल्याने या काळात सर्व बँकांचे ऑडिचे काम असल्याने दि. २६ मार्च ते ०१ एप्रील या काळात सर्व बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
परिणामी व्यापाऱ्यांसह सर्वांनाच बँकेतून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.परिणामी जर या काळात शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आनला तर त्याचे पेमेंट देण्यासाठी व्यापारी वर्गाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यंाना रोख रक्कम देण्यात अडचणी येतील.
त्यामुळे दि.२६ मार्च ते ०१ एप्रिल या काळात नेप्ती उपबाजार समितीतील कांदर लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. तरी या काळात सर्व शेतकऱ्यांनी कांदे विक्रीसाठी आनू नयेत, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.
तरीपण दि.०२ एप्रिलपासून बाजार समिती पूर्ववत सुरू होईल असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळवले आहे.