अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि.21) होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थींनी आयोगाच्या वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रिंटआऊट काढून सोबत ठेवावी.
त्यासोबतच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आणि इतर ओळखपत्र ज्याला आयोगानं मान्यता दिलीय त्याची झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी.
सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात हा परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोना काळात ही परीक्षा होत असल्यानं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी नियम करण्यात आले आहेत.
परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना तीन पदरी कापडाचा मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता करणे अनिवार्य आहे. पेपरच्या कालावधीत हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्यांना मिळणार पीपीई किट ताप, सर्दी,
खोकला अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आहे अशा उमेदवारांना स्वसंरक्षण साहित्य (पीपीई किट) पुरवण्यात येईल. त्यांची स्वतंत्र बैठकव्यवस्था करण्यात येईल.