अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेत बदल केला आहे.
तसेच बँक आता निवडक कामेच करणार आहे. ग्राहकांनी केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी बँकेच्या शाखेत भेट द्यावी.
तसेच बँकेच्या कामासाठी 31 मेपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यानच कामकाज सुरु राहणार आहे. कारण शाखा दुपारी अडीचपर्यंत बंद होणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.
जाणून घ्या काय असणार आहे नवीन वेळ एसबीआय शाखा आता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहणार आहे.
बँकेची प्रशासकीय कार्यालये आणि 50 टक्के कर्मचारी यांच्यासह संपूर्ण बँकेच्या कार्यालयीन वेळेत पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असंही बँकेनं नवीन अधिसूचनेत स्पष्टपणे सांगितलेय.
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बँक शाखेत जाणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावायलाच हवा, नाही तर त्यांना आत प्रवेश दिला जाणार नाही अशी सूचना देखील देण्यात आली आहे.