अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, मात्र ती काहीशी कायम आहे. यामळे लसीकरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
मात्र नेहमीप्रमाणे लसीचा तुटवडा जाणवत असल्याने हि मोहीम वारंवार खंडित होत आहे. यामुळे श्रीरामपूर मध्ये आज लसीकरण होणार नसल्याची माहिती मिळते आहे.
ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज गुरुवार दि. 10 जून 2021 रोजी लसीकरण बंद राहील.
त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरीच थांबावे. विचारपूस करण्यास लसीकरण केंद्रावर जावू नये. पुढील नियोजित लसीकरण सत्राची माहिती व्हाटसअप ग्रुपवर देण्यात येईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.
तालुक्यात 33 नव्या बाधितांची भर श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी नवीन 33 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता 592 रुग्ण अॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 56 होती. जिल्हा रुग्णालयात 01 खासगी रुग्णालयात 20 तर अॅन्टीजन तपासणीत 12 असे रुग्ण आढळून आले आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15091 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 14359 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.