Smartphone Blast : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! जाणून घ्या या गोष्टी, नाहीतर होईल स्फोट

Smartphone Blast : आज सर्वांच्या हातात तुम्हाला स्मार्टफोन पाहायला मिळतील. स्मार्टफोनमुळे आज अनेक कामे चुटकीसरशी होतात. स्मार्टफोन वापरणे जितके फायदेशीर असले तर ते तितकेच तोट्याचेही आहे.

जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून स्मार्टफोन स्फोटाशी निगडित बरीच प्रकरणे पुढे आली आहेत. त्यामुळे वापरताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

स्मार्टफोनचा मूळ चार्जर हरवला किंवा खराब झाला असेल तर अनेकजण बनावट चार्जर वापरतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर आजच ती सवय बंद करा. कारण बनावट चार्जर वापरला तर बॅटरी खराब होते. तसेच बॅटरी गरम झाली की तिचा स्फोटही होतो.

तसेच तुमचा चार्जर खराब झाला असेल तर तुम्ही पुन्हा कंपनीचा मूळ चार्जरच खरेदी करा. तसेच स्मार्टफोन चार्ज करत असताना कधीही गेम खेळू नये.

जर तुम्ही असे केले तर स्मार्टफोनच्या बॅटरीवर जास्त दबाव येतो, त्यामुळे तो जास्त गरम होण्याची आणि फुटण्याची शक्यता जास्त असते. तसेच, तो जर तुमचा स्मार्टफोन गरम झाला तर आपण ताबडतोब वापरणे थांबवा.

सतत तुमचा स्मार्टफोन गरम होत असेल तर तुमच्या जवळच्या सेवा केंद्राला दाखवा. जर तुम्ही पण फोन वापरत असाल तर तुम्हाला या गोष्टींची माहिती हवी.