ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.(Student News) 

12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होणार आहे. तर 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 साली 12वीची लेखी परीक्षा 4 मार्च रोजी होणार असून 10वीची लेखी परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते.

ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. परंतु शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक जाहीर केले.

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

इयत्ता बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा ही 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा ही 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे.

दरम्यान या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवरून 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतील, याविषयी देखील माहिती दिली आहे.

12वीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर 10वीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office