अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! …तर होणार वीजपुरवठा खंडित !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात महावितरणची विविध वर्गवारीतील एकूण ३ लाख १८ हजार ६८५ ग्राहकांकडे ४७७ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे.

सध्या आर्थिक स्थिती गंभीर असल्याने थकबाकी वसुल करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, सदर ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे.

त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

अहमदनगर मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण २ लाख ७८ हजार ग्राहकांकडे ५५ कोटी ८४ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील २७ हजार ४०४ ग्राहंकांकडे १३ कोटी ३९ लाख रुपये,

औद्योगिक वर्गवारीतील ३ हजार ८४८ ग्राहकांकडे ३ कोटी ७६ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील ३ हजार ५३७ ग्राहकांकडे ३४२ कोटी ९६ लाख, पाणीपुरवठा योजनेतील१ हजार ६५९ ग्राहकांकडे ५८ कोटी १२ लाख,

यासह सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील ४१८३ ग्राहकांकडे ३ कोटी ७ लाख असे एकूण अहमदनगर मंडळात ३ लाख १८ हजार ६८५ ग्राहकांकडे ४७७ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे.

महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसुली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे.