परीक्षार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! टीईटी परीक्षा ‘या’ दिवशी होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबरला होणार आहे.

आरोग्य विभागाची गट ड परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार असल्यानं टीईटीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. राज्य परीक्षा परीषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी राज्यभरातून राज्यात 3 लाख 30 हजार 642 उमेदवारांनी संबंधित परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात येत्या 31 आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गासाठीच्या परीक्षा होणार असल्याने टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी विनंती शिक्षण विभागाला करण्यात आली होती.

दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन 2018-19 नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे.

इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर

प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

वेबसाईट टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर  https://mahatet.in/ प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

परीक्षेचं वेळापत्रक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक 30/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक 30/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30