ताज्या बातम्या

महत्वाची बातमी ! आजपासून बदलणाऱ्या ‘या’ गोष्टींमुळे तुमच्या जीवनावर होणार परिणाम

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- आपल्या देशात दर महिन्याच्या एक तारखेला काही ना काही बदल किंवा नवे नियम लागू होत असतात. त्याच धर्तीवर आजपासून काही बदल होत आहेत. यापैकी काही बदलांमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. तर चला मग पाहुयात आजपासून काय काय बदल होत आहे.

WhatsApp …

आजपासून WhatsApp काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर काम करणे बंद करणार आहे. WhatsApp वर दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचा हा प्लॅटफॉर्म Android 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.

गॅस सिलेंडर – तुम्ही गॅस डिलरकडे नोंदवलेला तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर जर चुकीचा असेल तर तुमच्या एलपीजी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते. तसेच सिलिंडरची बुकिंग केल्यावर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे. ज्यावेळेस एलपीजी गॅस सिलिंडर घेऊन कर्मचारी येईल तेव्हा तुम्हाला तो ओटीपी त्याला द्यावा लागेल त्यानंतर तुम्हाला सिलिंडर मिळणार.

रेल्वेचे वेळापत्रक बदलले :- रेल्वेचे नवीन वेळापत्रक आजपासून लागू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बाहेरगावी जाण्याचे नियोजन करत असाल तर रेल्वेगाड्यांच्या बदलेल्या वेळांची दखल घ्या. देशात धावणाऱ्या सुमारे ३० राजधानी गाड्यांच्या वेळाही आजपासून बदलणार आहेत.

इंडेन गॅस…

इंडेनने त्यांच्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर गॅस बुक करण्यासाठी एक नवीन क्रमांक पाठवला आहे. आता इंडेन गॅसच्या ग्राहकांना एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.

शुल्क आकारणी…

शुल्क आकारण्यासाठी बँकांना पैसे जमा करावे लागतील. आता बँकांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदा ने याची सुरुवात केली आहे. आजपासून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग केल्यास वेगळे शुल्क आकारले जाईल.

Ahmednagarlive24 Office