अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ४४ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे.
स्टेट बॅंकेने ट्विट करून माहिती दिली आहे की १० जुलैला रात्री १०.४५ वाजेपासून ११ जुलैच्या सकाळी १२.१५ पर्यत मेंटेनन्समुळे योनो (YONO), युपीआय (UPI), योनो लाइट ( YONO Lite) या सेवा बंद राहतील.
अशा परिस्थितीत जर ग्राहकांचे काही महत्त्वाचे काम असेल किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर या ही कामे ग्राहकांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत. स्टेट बॅंकेचे ग्राहक सध्या चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत.
एक अहवालानुसार चीनी हॅकर्स स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना फिशिंगद्वारे शिकार बनवत त्यांच्या खात्यातून पैसे गायब करत आहेत.
चीनच्या हॅकर्सकडून एसबीआयच्या ग्राहकांना एक लिंक शेअर करण्यात येते आहे आणि त्यानंतर केवायसी अपडेट करण्याची सूचना करण्यात येते आहे. यासाठी अनेक ग्राहकांना ५० लाख रुपयांपर्यतच्या गिफ्टची ऑफर देण्यात येते आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. SBI च्या कोणत्याही ग्राहकांनी आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन शेअर करु नका, असा सल्ला दिला आहे.
तसेच अज्ञात लिंकवरुन कोणतेही अॅप डाऊनलोड करु नका. त्याशिवाय तुमची एसबीआय, आरबीआय, सरकारी कार्यालय, पोलीस, केवायसी अधिकारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्यांपासून सावध राहा.
कुठे तक्रार कराल? :- दरम्यान जर तुम्हाला अशाप्रकारे कोणताही ई-मेल/ एसएमएस, फोन कॉल आला तर तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. अनेकदा इंटरनेट बँकिंगद्वारे तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात.
जर तुम्हाला अशाप्रकराची काही फसवा मेल आला तर .phishing@sbi.co.in यावर तात्काळ कळवा. तसेच एसबीआयच्या सर्व ग्राहकांना याची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही