कोरोना लढाईचा महत्वपूर्ण टप्पा…१८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणे अत्यंत महत्वाची बनली आहे.

यातच आता देशाने कोव्हिड 19 विरुद्धच्या लसीकरण मोहिमेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे. १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली.

प्रारंभी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, नंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी १ मेपासून १८ ते ४४ हा टप्पाही सुरू झाला होता; परंतु काही कारणास्तव तो बंद करण्यात आला होता.

आता पुन्हा २२ जूनपासून १८ ते २९ या वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय केंद्रांवर ही लस उपलब्ध असेल. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे.

त्यामुळे आता १८ वर्षांपुढील सर्वांना लस घेता येणार आहे. लस जशी उपलब्ध होईल तशी ती नागरिकांना मिळेल. कोणीही केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान देशातील सर्व राज्यातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल.

लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही.

अहमदनगर लाईव्ह 24