अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- काही दिवसांपूर्वी ‘सुल्ली डील्स’वरून सोशल मीडियावर बराच वाद झाला होता. सुल्ली डील्स अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना टार्गेट करून त्यांच्या आक्षेपार्ह फोटोंच्यासाठी बोली लावली जात होती.
आता ‘सुल्ली डील्स’ वादानंतर 6 महिन्यांनी पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे. सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लीम महिलांचे फोटो, फाईल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत; असे मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते.
या सुल्ली डील ॲपवरून महिलांसंबंधीची माहिती विविध समाजमाध्यमांवरसुद्धा प्रसारित झाली आहे. त्यामुळे सर्व समाज माध्यमंवरून ती माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी.
तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत,” अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.
काय आहे सुल्ली डील्स? ‘सुल्ली’ एक टर्म आहे, ज्याचा वापर काही लोक मुस्लीम महिलांसाठी करतात. सुल्ली डिल्स (Sulli Deals) गिटहबवरील एक अॅप आहे.
ते ओपन केल्यानंतर यूझर्सना मेसेज दिसेल, ‘Find your Sulli Deal of the Day’. पुढे गेल्यानंतर आपल्याला रँडमली कुण्या मुस्लीम महिलेचा फोटो दिसेल.
जी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरून घेतलेली असेल. खरे तर, याच्याशी संबंधित लोकांनी ट्विटरवरवर ‘डील ऑफ द डे’ म्हणून फोटो शेअर करायला सुरुवात केल्यानंतर, या अॅपची चर्चा सुरू झाली.