ताज्या बातम्या

ज्ञानवापी मशिद प्रकरणी आज महत्त्वाचा निकाल

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News:ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिरप्रकरणी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

आजच निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाराणसीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्ञानवापीमध्ये मशिद होती की मंदिर.

त्याचसोबत प्लेसेज ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१ लागू होणार का? हे स्पष्ट होणार आहे. या निर्णयाचा परिणाम ज्ञानवापी संबंधित सत्र न्यायालयात सुरु असलेल्या इतर प्रकरणांवरही होणार आहे.

आज दुपारी दोन वाजता न्यायालय आपला निर्णय देणार आहे. शंकराचे प्राचीन मंदिर तोडून तिथे मशिद बांधली असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पाच वेगवेगळ्या महिलांनी एकत्र येत ज्ञानवापी मशिदीच्या मागच्या दिशेला असलेल्या शृंगार गौरीची दररोज पूजाअर्चा करता यावी अशी मागणी करत याचिका दाखल केली होती.

सुनावणी दरम्यान मे महिन्यात सिव्हील जज रवि कुमार दिवाकर यांनी ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. चार दिवस सुरू असलेल्या या सर्व्हेक्षणात १५०० फोटो आणि १२ तासांची व्हिडिओग्राफी करण्यात आले.

वाराणसीच्या अंजुमन इंतजामिया मशिद कमिटीने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्ञानवापी परिसरात असलेली मशिद ५०० वर्ष जुनी असून स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरच्या काळातही ती त्याच परिसरात उभी आहे, असा दावा केला आहे.

Ahmednagarlive24 Office