ताज्या बातम्या

इम्रान बागवान यांची काँग्रेसच्या शहर जिल्हा सरचिटणीस पदी निवड

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- इम्रान उमर बागवान यांचे काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे तसे नियुक्तीचे पत्र शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ काळे यांच्या हस्ते इम्रान बागवान यांना काँग्रेस कमिटीत झालेल्या समारंभामध्ये प्रदान करण्यात आले आहे.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रक तथा काँग्रेसच्या बांगलादेश मुक्ती संग्राम अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक कॅप्टन प्रवीण डावर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माजी सैनिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभेदार सूर्यवंशी, प्रदेश सचिव दीप चव्हाण,

ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रिडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, इंटकचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष अज्जू शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट,

राहुल गांधी मंचचे अध्यक्ष सागर ईरमल, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने, गणेश भोसले,उषाताई भगत, जरीना पठाण, शारदाताई वाघमारे, राणीताई पंडित, हेमलता घाटगे, राणीताई गायकवाड, गणेश आपरे, मोहन वाखुरे, अजय मिसाळ, निसार बागवान, शरीफ सय्यद आदी उपस्थित होते.

इम्रान बागवान यांनी प्रभाग क्रमांक ११ मध्ये नागरी समस्यांवर सातत्याने आवाज उठवण्याचे काम केले आहे. एनआरसी विरुद्धच्या मोर्चात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. मोहरम, शिवजयंती, आंबेडकर जयंती यासारख्या उपक्रमांमध्ये त्यांचा कायम सक्रिय सहभाग असतो.

कोरोना काळात त्यांनी गरजूंना अन्नधान्य, मास्क वाटप करून लोकांना मदत केली आहे. यासाठी त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. मानव भारत अधिकार संरक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

यावेळी किरणभाऊ काळे म्हणाले की, इम्रान बागवान एक तरुण नेतृत्व आहेत. त्यांच्या मागे युवाशक्तीचे मोठे संघटन आहे. त्यांना पक्षाची संपूर्ण ताकद देण्याचे काम केले जाईल. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना बागवान म्हणाले की,

किरणभाऊ काळे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नगर शहरामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अधिक मजबूत करत सार्थ करण्यासाठी अहोरात्र काम करणार आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा शहरातल्या प्रत्येक घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.

इम्रान बागवान यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Ahmednagarlive24 Office