अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात एका 22 वर्षीय तरुणाने एक 21 वर्षीय तरुणीस पळवून नेले आणि लग्न केले. जेव्हा दोघे पोलीस ठाण्यात आले असता मुलीच्या नात्यातील काही समर्थकांनी या नवोदीत नवरदेवास अकोले पोलीस ठाण्याच्या गेटवर मारहाण केली.
प्रियकराच्या सोबत जाणार….त्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. काही झाले तरी मी मुलाच्या सोबत लग्न केले आहे. त्यामुळे, मी घरच्यांच्या सोबत नव्हे तर माझ्या प्रियकराच्या सोबत जाणार असल्याचे त्या मुलीने स्पष्ट केले.त्यामुळे, काही लोकांनी तेथे स्टण्टबाजी करीत धिटाई करण्याचा प्रयत्न केला.
आज या नवोदीत दाम्पत्यास पोलिसांनी संरक्षण दिले आहे. मात्र, त्यांच्या पुढील सुरक्षेचा प्रश्न काय? असा प्रश्न पुढे येऊन ठेपला आहे.
पोलीस ठाण्यात गुंडांचा वावर :- पोलिसांकडून या वादाची फारशी दखल घेतली नाही. जेव्हा हे जोडपे पोलीस ठाण्यात आले तेव्हा एक पोलिसांवर विश्वास म्हणून त्यांनी तेथे घाव घेतली होती.
मात्र, पोलीस ठाण्याच्या आवारात जर कोणी त्यांना मारहाण करीत असेल तर अकोले पोलीस ठाण्यात नेहमीच गुंडांचा वावर असतो की काय? असा प्रश्न पडतो.
तर जनतेने जायचे कोठे? :- विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने या तरुणास मारहाण केली. तो संबंधित मुलीचा नातेवाईक नाही. तो पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्याचा सहयोगी आहे.त्यामुळे, सुरक्षित ठिकाणी असुरक्षितता मिळत असेल तर जनतेने जायचे कोठे? असा प्रश्न अनेक सुज्ञ व्यक्तींनी उपस्थित केला आहे.