अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ वेळेत असेल जमावबंदी जाणून घ्या काय असेल सुरु आणि काय बंद ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला.

जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा जमावबंदी आदेश लागू केला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रति व्यक्ती १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या फिरण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत निर्बंध असणार आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा यादी करुन शोध घेणे, त्यांना अलग ठेवणे व १४ दिवस संपर्कात राहणे. ८० टक्के संपर्कातील व्यक्तींचा ७२ तासांच्या आत शोध घेणे, याला प्राधान्य दिले जात आहे.

रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत सर्व सार्वजनिक ठिकाणे (उद्याने, बागा इ.) बंद राहतील. विनामास्क आढळलेल्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुकताना आढळलेल्या व्यक्तीस १ हजार रुपये दंड असेल.

सर्व सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स , रेस्टॉरंटस् हे रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत बंद राहतील. परंतु हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, यांना घरपोच सेवा आणि पार्सल सुविधा देण्यास मान्यता आहे.

आदेशाचे उल्लंघन झाल्यास, संबंधित सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् हे केंद्र शासनाव्दारे कोविड-१९ साथरोग हा आपत्ती म्हणून जाहीर केलेल्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच उल्लंघन केलेले ठिकाणचे मालकाला आपत्ती कायद्मातंर्गत दंड देखील केला जाईल.

सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मनाई राहील. प्रेक्षागृह किंवा नाट्यगृहे यांचा वापर करण्यास मनाई राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्यांतर्गत दंड केला जाईल.

तसेच ही मालमत्ता बंद करण्यात येईल. फक्त विवाह समारंभास जास्तीत-जास्त ५० व्यक्तींना एकत्र येण्यास निबंध असणार नाहीत.

मंगल कार्यालय, लॉन्स, मॅरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणी लग्न समारंभासाठी आलेले व-हाडी, पाहुणे मंडळी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, आचारी व इतर उपस्थित सर्व व्यक्ती मिळून ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल, असेही आदेशात म्हटले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24