अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- अहमदनगर शहरात आणखी चार सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आलीय. शहरात आतापर्यंत १९ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १९ :- नगर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मायक्रो कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले आहेत. आज आणखी ४ झोन वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरातील मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १९ वर पोहोचली आहे.
६६० जणांना काेराेना :- गेल्या २४ तासांमध्ये ६६० जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात २३८ जणांना काेराेना संसर्ग झाला आहे. नगर शहरात वाढत्या काेराेना संसर्गामुळे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र देखील वाढले आहेत.
तालुकानिहाय परिस्थिती :- शहर २३८, राहाता ७७, संगमनेर ५७, काेपरगाव ३५, नेवासे ३१, पाथर्डी ३१, राहुरी २७, नगर तालुका २६, श्रीरामपूर २३, कर्जत २२, पारनेर १९, भिंगार शहर १८, अकाेले १६, शेवगाव १४, जामखेड १२, श्रीगाेंदे ०७, इतर जिल्ह्यातील ०७ जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
भिंगार शहरात गेल्या २४ तासांमध्ये १८ जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयाेगशाळेनुसार २३१, खाजगी प्रयाेगशाळेनुसार ३४९ आणि रॅपिड चाचणीनुसार ८० जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.
हे आहेत चार नवे मायक्रो कंटेन्मेंट झोन :- बालिकाश्रम राेडवरील वसंत विहार बिल्डिंग, शहर गावठाण भागातील नागंरे गल्ली परिसर, सावेडीतील सावली साेसायटी आणि आगरकर मळ्यातील समर्थ काॅलनीमध्ये अशाेक जैन ते प्रल्हाद जाेशी घर ते गाेसावी यांच्या घरापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहे.
दि. १ एप्रिलपर्यंत प्रतिबंध :- याठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन सेवेसह वाहतुकीला दि. १ एप्रिलपर्यंत प्रतिबंध राहणार आहे. बालिकाश्रम राेडलगत असलेल्या वसाहतींमध्ये काेराेना संसर्गाचा वेग वाढला आहे. येथे आतापर्यंत चार ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाले आहेत.
सर्व व्यवहार बंद राहणार :- सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मनपाचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत राहणार आहेत.