दिवसाढवळ्या चोरटयांनी पैशाची बॅग लांबवली; शहरातील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी हि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण आता घराबाहेर पडणे देखील धोक्याचे बनू लागले आहे.

नुकतेच श्रीरामपूर शहरातील मेनरोडवर सुमारे 23 हजार रुपयांचा ऐवज असणारी बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील वढणे वस्ती येथे राहणार्‍या सुषमा सुशांत सातदिवे (वय 34)

या 1 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अमोल फूट वेअरते नटराज बुक स्टॉल दरम्यान आपली 23 हजार 500 रुपये ऐवजाची त्यात सोन्याचे दागिने, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे एटीएम इतर कागदपत्र असलेली बॅग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.

दरम्यान सुषमा सुशांत सातदिवे यांनी याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास काळे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24