मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी काही आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. त्यानंतर अनेक राजकीय पडसाद उमटले. मुंबई पोलिसांचा याबाबत तपस सुरु आहे.
पोलिसांच्या या तपासात मोठी माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणारे आरोपींचे संभाषण आता पोलिसांच्या हाती आले. हा कट पूर्वनियोजित आणि कोणाच्या तरी साग्न्यवरून झाला असल्याचा आरोप महाविकास आघडीतील नेत्यांनी केला आहे.
आंदोलन प्रकरणातील दोन आरोपींचं संभाषण
( ए -अभिषेक पाटील आणि बी- संदीप गोडबोले)
अभिषेक : हॅल्लो
संदीप गोडबोले : बोल अभिषेक
ए – तिथेच जाऊ का?
बी – हा तिथेच जायचे
ए – आम्ही बंगल्याच्या तिथे चपला सोडल्या. आम्ही लवकर आलो. आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लोक लय आले. काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब. करावं तर सगळं आपणच करावं. बाकीचे निवांत बसावे. इथे येऊन साहेबाना लगेच सांगितलं. मुदलियार पाटील आताच आले. आता रात्रभर मैदान आहे. सकाळी 9 पर्यंत अंघोळ करून पण येऊ नये का.
बी – आता कुठे आहात तुम्ही…
ए – इथे सगळ्या महिला घेतल्यात डायरेक्ट. त्यांना तिकीटाला पैसे दिलेत. तिकीट काढलेत निघालेत. 70 ते 80 महिला आणि माणसं 100 -200
बी – महालक्ष्मी पेट्रोल पंप कुठे आहे विचारा
ए – बर पेट्रोल पंपावर ना – मीडिया आली
बी – मीडिया आली आहे.
ए – चला मीडिया आली भाऊ
बी – हो
शरद पवार यांच्या वरील हल्ल्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा हात असू शकतो असा पोलिसांचा अंदाज आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.
महाविकास आघडीतील नेत्यांनी भाजपच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. तर काही भाजपच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर काही भाजप नेत्यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.