घोडेगाव कांदा मार्केटमध्ये तब्बल पाऊण लाख कांदा गोण्यांची आवक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- नुकतेच लॉकडाऊन उठल्यानंतर नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केट सुरू झाले आहे त्यामुळे कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरदिवशी कांद्याची होणारी आवक हि रेकॉर्डब्रेक ठरू लागली आहे.

नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी जवळपास 75 हजार (74 हजार 916) कांदा गोण्यांची आवक झाली. भाव जास्तीत जास्त 2300 रुपयांपर्यंत निघाले.

घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची प्रचंड आवक सुरू आहे. बुधवारी 74 हजार 916 गोण्या (41 हजार 782 क्विंटल) आवक झाली. मोठ्या मालाला 1900 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

मध्यम मोठ्या मालाला 1800 ते 1900 रुपये, मध्यम मालाला 1600 ते 1700 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 900 ते 1300 रुपये तर जोड कांद्याला (onion) 400 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

एक-दोन वक्कलला 2200 ते 2300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान पाऊसाचे वातावरण,खरीपाची लगबग,कांदा साठवण्याची अडचण व कांदा खराब होण्याचे प्रमाण यामुळे घोडेगाव कांदा मार्केटला मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत आहे.

मार्केट सुरू झाल्यापासून कांद्याचे भाव टिकून आहेत,शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी खुश होत आहेत.

उच्च प्रतीचा कांदा माल व योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीददार घोडेगाव कांदा मार्केट येथे कांदा खरेदीसाठी येतात. त्यामुळे कांदयास नेहमी चांगला भाव मिळतो त्यामुळे शेतकरी बांधवांत नेहमी समाधानाचे वातावरण असते.

अहमदनगर लाईव्ह 24