अवघ्या १६ दिवसात साईबाबांच्या झोळीत १८ कोटींचे दान…!

Ahmednagar News:संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांची महती सातासमुद्रापार पोहोचली असल्याने मोठ्या श्रद्धेने भाविक शिर्डी तिर्थक्षेत्री साईदरबारी येत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

श्री साईबाबांच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या दिपावली उत्सवादरम्यान देशविदेशातून लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली होती. दि. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२ यादरम्यान साईसमाधी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी साईबाबांच्या झोळीत सुमारे १७ कोटी ७७ लाख ५३ हजार ३१२ रुपयाचे दान जमा झाले.

यामध्ये देणगी काउंटरवर ७ कोटी ५४ लाख ४५ हजार ४०८ रुपये तर दक्षीणापेटीत ३ कोटी ११ लाख ७९ हजार १५४ रुपये जमा झाले. ऑनलाईन पद्धतीने १ कोटी ४५ लाख ४२ हजार ८०८ रुपये, चेक, डी.डी. याद्वारे ३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये,

Advertisement

मनिऑर्डरद्वारे ७ लाख २८ हजार ८३३ रुपये, डेबीट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातुन १ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये जमा झाले. एकून २९ देशातील विदेशी भाविकांनी अंदाजे सुमारे २४ लाख ८० हजार ७०१ रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे.

५ लाख ४५ हजार ९७७ रुपये किंमतीची १३३४५.९७० ग्रॅम चांदी आणि ३९ लाख ५३ हजार २९ रुपये किंमतीचे ८६०.४५० ग्रॅम सोने जमा झाले. साईसंस्थानला प्राप्त झालेल्या दानाचा उपयोग भाविकांच्या मुलभूत सुख-सुविधांसाठी करण्यात येतो.

Advertisement