अवघ्या 24 तासात सापडले 83 कोरोनाबाधित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-श्रीरामपूर तालुक्यात काल बुधवारी एकाच दिवसात 83 करोना बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

जिल्हा रुग्णालयात 16, खासगी रुग्णालयात 61 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 06 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 6 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. आता प्रशासनासह नागरिकांनी काळजी घेतली तरच करोना कमी होऊ शकेल, अशी माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 279 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 492 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 213 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे तर सध्या एकूण अंदाजे 279 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

दरम्यान काल बुधवारी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पालिकेचे मुख्यााधिकारी गणेश शिंदे यांनी श्रीरामपूर शहरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह अनेक दुकानांत पाहणी करून मास्क न लावणार्‍या कर्मचारी,

दुकानदार व ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच करोना पॉझिटिव्ह असणार्‍या रुग्णांच्या घराच्या दारावर स्टिकर चिकटवले की नाही याची पाहणी केली.

दरम्यान करोना नियमांचे उल्लंघन करणारे शहरातील दुकाने सील करण्याचे अधिकार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तर ग्रामीण भागातील दुकाने सात दिवस सील करण्याचे अधिकार तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24