अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे, यातच दरदिवशी बाधितांची संख्या वाढत असताना मृत्यू दर देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातच कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत आहे.
यातच कोपरगाव तालुक्यात 145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच गेल्या 24 तासात तालुक्यात मोहिनी राजनगर येथील 36 वर्षींय महिला,
शिरसगाव येथील 54 वर्षीय पुरुष, कोपरगाव येथील 50 वर्षीय पुरुष, टाकळी येथील 75 वर्षीय पुरुष या चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात आज 9 मे पर्यंत 10 हजार 64 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 8 हजार 934 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1041 अॅक्टिव पेशंट आहे.
तर मृत्यूचे प्रमाण 1.45 टक्के असे आहे. तर 147 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.