अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील खुले नाट्यगृह समोरील हॉटेल किशोर ग्रँडमध्ये तरुणांमध्ये आपसात वाद होवून त्यांनी हॉटेलच्या काचा फोडून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.10) साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला आहे.
या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील खुले नाट्यगृह समोरील किशोर ग्रँड हॉटेलमध्ये तरुणांमध्ये आपसात वाद झाला.
याचे पर्यावसान थेट हाणामारीत झाले. यामध्ये हॉटेलच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. तसेच सार्वजनिक शांतता भंग करत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.
याबाबत पोलीस कर्मचारी संभाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आकाश परीभाऊ राखपसरे (वय 19), गौरव संजय सरोदे (वय 19),
तुषार संजय ठोकळ (वय 20), शुभक केशव राखपसरे (वय 19, सर्व रा.गजानन नगर, कोपरगाव) आणि इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरोधात गुरनं.277/2021 भादंवि कलम 160, 470, मुं.पो.का.कलम 37 (1), 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ठोंबरे हे करत आहे.