अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-   पतीला मोटार सायकल खरेदी करण्यासाठी व घराची उधारी देण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी बोल्हेगावला विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे व पतीचे मामा, आत्या यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 डिसेंबर 2016 ते 6 सप्टेंबर 2021 दरम्यान शहरातील बोल्हेगाव फाटा, संत तुकाराम नगर येथे विवाहितेच्या सासरच्या घरी घटना घडली. याप्रकरणी पीडित विवाहिता महिलेने (वय 28) हिने 6 सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती प्रशांत दंडवते, सासरा दत्तात्रय रघुनाथ दंडवते,

सासु अलका दत्तात्रय दंडवते व पतीचा मामा लक्ष्मण भागवत जाधव, आत्या शोभा संभाजी थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती व सासरच्या मंडळींनी विवाहित महिलेला पतीला मोटार सायकल घेण्यासाठी व घराची उधारी देण्यासाठी दीड लाख रुपयाची मागणी केली होती.

विवाहितेने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहान करुन दमदाटी करण्यात आली. तीला उपाशी पोटी ठेऊन मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरुन सबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.