अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-अपेंडिसाइटिस हे नाव तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल. जसं याचं नाव आहे तसाच हा आजार देखील भयानक आहे. अॅपेंडिक्स हा आपल्या शरीरातील एक अवयव असून त्याला सूज आल्यास अपेंडिसाइटिसची समस्या निर्माण होते.
अपेंडिसाइटिसची व्याधी हि खूप काळ व्यक्तीला त्रास देते. अॅपेंडिक्स संसर्गामुळे देखील होऊ शकते. या आजारावर उपचार तर खूप आहेत आणि हे उपचार त्वरित घ्यायला हवेत. पोटात सूज आल्याने अॅपेंडिक्स पोटातही फुटू शकते.
याशिवाय जास्त ताप, उलट्या होणे, भूक न लागणे, थंडी वाजणे ही देखील या आजाराची लक्षणे आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही घरगुती उपचार जे तुम्ही आपत्कालीन स्थितीत वापरू शकता. परंतु यावर वैद्यकीय सल्ला घेणेच सोयीस्कर पडेल.
१) एरंडेल तेल :- एरंडेल तेल अॅपेंडिक्सच्या सुजेवर आणि वेदनेवर अतिशय उपयुक्त ठरते. एरंडेल तेलात रिसिनोलिक अॅसिड आढळते ज्यात वेदना कमी करणारे आणि सूज कमी करणारे गुणधर्म व घटक असतात. एक मऊ कापड घ्यावे आणि दोन चमचा एरंडेल तेलात हा कपडा बुडवून काही वेळ ज्या ठिकाणी सूज आली आहे आणि वेदना होत आहे त्या भागावर लावावा. दिवसातून दोन वेळा असे केल्यास काही दिवसांत तुम्हाला यावर फरक दिसून येईल.
2 ) ताक ताक :- आपल्या पचन यंत्रणेला कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून लढण्यासाठी सक्षम बनवते. तज्ञ सांगतात की ज्यांना अॅपेंडिक्सची समस्या आहे त्यांनी दिवसातून किमान १ लिटर ताक प्यायलाच हवे. यात जिरे, पुदिना मिसळून प्यायल्यास अजून चांगला फायदा दिसतो.
३) बेकिंग सोडा :- बेकिंग सोड्यामध्ये सूज विरोधी गुणधर्म असतात जे अॅपेंडिक्सची सूज कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. बेकिंग सोड्याच्या सेवनामुळे पचन शक्तीला आराम मिळतो आणि अॅपेंडिक्सच्या वेदना सुद्धा कमी होतात. एक ग्लास पाण्यात बेकिंग सोडा मिसळून प्यावा. जेव्हा जेव्हा वेदना सुरु होतील तेव्हा तेव्हा या मिश्रणाचे सेवन करावे.
४) चिंचेच्या बिया : चिंचेच्या बिया बारीक करून पेस्ट बनवून नंतर पोटावर लावा. यामुळे जळजळ कमी होते.
५) मोहरी ग्राइंड करा: अॅपेंडिक्सचा त्रास कमी करण्यासाठी मोहरी ग्राईंड करून घ्या आणि पोटावर चोळा. थोड्या वेळाने ते धुवा. याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.