अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेल्या महिन्यापासून राहुरी तालुक्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणायला सरकारी यंत्रणेला अपयश आले असून मोठे प्रयत्न करूनही रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे.
आज शुक्रवारी नव्याने ८४ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची भर पडत आहे तर दुसरीकडे रुगणांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
यातच राहूरी तालुक्यात आज दिनांक २ एप्रिल रोजी दिवसभरात एकूण ८४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या वाढतच असल्याने नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क, सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करावा.
तसेच ज्यांना काही त्रास जाणवत असेल त्यांनी तातडीने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार एफ.आर.शेख यांनी केले आहे.