अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा नेहमीच उत्तरेकडील भागामध्ये आढळून आला. यामधेय संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव त्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुकाही यामध्ये आघाडीवरच राहिला.

सध्या स्थितीला श्रीरामपूर मध्ये बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली असून त्यातुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या घटली आहे. हि अत्यंत चिंताजनकबाब आहे.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 320 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 1376 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 142 होती. जिल्हा रुग्णालयात 02, खासगी रुग्णालयात 279 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 39 असे रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 13978 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 12408 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल तालुक्यात करोनाबाधित रुग्णांनी डोके वर काढल्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी झाल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24