सहा महिन्यात ‘या’ कृषी शेअरने केले 1 लाखाचे 12 लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- शेअर बाजाराने मागील काही महिन्यात धुवाधार बॅटिंग केली आहे. बाजारातील या तेजीमुळे काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना भरभरून कमाई करून दिली आहे.

छोट्याशा गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. यातच एका कृषी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

असाच गुंतवणुकदारांना छप्परफाड परतावा देणारा एक शेअर म्हणजे ‘ताझा इंटरनॅशनल लि. हा आहे. ताझा इंटरनॅशनल ही कृषी उत्पादनाच्या क्षेत्राती कंपनी आहे.

कंपनीची स्थापना २००१ मध्ये झाली होती. कोलकाता स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीची नोंदणी २००३ मध्ये झाली होती. सध्या शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर पोचले असून अनेक शेअर्स त्यांच्या उच्चांकीवर आहेत. बाजाराची जबरदस्त घोडदौड सुरू आहे.

अशा परिस्थितीत अनेक शेअरच्या किंमतीमध्ये वास्तविक मूल्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यात ताझा इंटरनॅशनल लि.च्या शेअरची किंमत जवळपास १२ पटींनी वाढली आहे.

सध्या हा शेअर २८.८० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहे. तर सहा महिन्यापूर्वी म्हणजे १ एप्रिल २०११मध्ये ताझा इंटरनॅशनल लि.च्या शेअरची किंमत २.३६ रुपयांच्या पातळीवर होती.

या कालावधीत ताझा इंटरनॅशनलच्या शेअरच्या गुंतवणुकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे. फक्त सहा महिन्यांच्या कालावधीत या शेअरने जवळपास १,१२०.३३ टक्के परतावा दिला आहे.

म्हणजेच सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास १२ लाख रुपये झाले आहे. ‘ताझा इंटरनॅशनल लि.या कृषी क्षेत्रातील कंपनीचा.

ताझा इंटरनॅशनल लि ही बियाणे, खते आणि इतर कृषी उत्पादनांच्या व्यवसायात कार्यरत असणारी कंपनी आहे. सध्या या शेअरची किंमत २८.८० रुपये प्रति शेअर आहे.

मागील सहाच महिन्यात वर्षात ‘ताझा इंटरनॅशनल’ ने १,१२० टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरने गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण करून दिली आहे.