श्रीरामपूर तालुक्यात रुग्णसंख्या जास्त असतानाही इंजेक्शन कमी व तर दुसरीकडे ऑक्सिजनची मारामार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-श्रीरामपूर तालुक्यासाठी रविवार हा दिलासा देणारा ठरला असून दररोज सरासरी २०० च्या आसपास रुग्ण बाधित व्हायचे हीच संख्या रविवारी घटून ११३ वर गेली आहे.

त्यामुळे काहिसा दिलासा मिळाला असून अशीच रुग्णसंख्या घटत जावी असेच सर्वजण प्रार्थना करीत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात केवळ सरासरी १२२ रुग्ण बाधित होते. मात्र, नागरिकांचा निष्काळजीपणा व अनिर्बंध गर्दी, मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा हरताळ या सर्व गोष्टींमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली.

मार्च महिन्यात तोच आकडा १ हजार २१८ इतका झाला. तरीही काळजी घेतली नाही आणि आता एप्रिल महिन्यात २३ पर्यंत ३ हजार ४११ कोरोना बाधित सापडत आहेत. आता दररोज सरासरी १५० ते २०० रुग्ण बाधित होत आहेत.

मागील दहा दिवसांत १ हजार ६३८ रुग्ण, तर गेल्या सात दिवसांत १ हजार २२९ रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण आहे. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यात ८ हजार १९१ रुग्ण बाधित झाले आहेत.

तर यापैकी ६ हजार ३७६ रुग्ण बरे झाले आहेत, तर १०१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७६ टक्के असून मृत्यूचे प्रमाण १.२३ टक्के आहे.

सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. रुग्णसंख्या जास्त असतानाही इंजेक्शन त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. तर दुसरीकडे ऑक्सिजनची मारामार असल्याने उपचार करण्यात अडचणी येत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24