अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- अभिनेत्री तापसी पन्नू आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान या दोघांशी संबंधीत ऑफिसेस आणि मालमत्तांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आले आहे. दरम्यान नुकतेच या प्रकरणावर बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री कांगावा रानौत हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनुराग कश्यप सोबतच निर्माता विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना यांच्यावरही कारवाई सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींच्या घोळ असल्याचं समोर आलं आहे.अभिनेत्री तापसी पन्नूने पाच कोटींची रोख रक्कम घेतल्याचे पुरावे आढळले आहेत. आता याचा पुढील तपास सुरू आहे. २०११ ते २०१८ या वर्षांतील करचुकवेगिरी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आता या प्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनंही उडी घेतली आहे. कंगना रणौतनं एका न्यूज पोर्टलच्या बातमीची लिंक शेअर केली आहे. “आयकर विभागानं दावा केलाय की त्यांनी फोनमधील डेटा साफ केला आहे. मनी लाँड्रिंग आणि त्यातील हिस्सा असलेल्या भागीदारीचा आकडा आश्चर्यकारक असून शकतो,” असं त्यावर तिनं लिहिलं आहे.
“मला पहिल्यापासूनत त्यांच्यावर संशय होता जेव्हा महागड्या राष्ट्रविरोधी जाहिरातींमधून त्यांना प्रवासी मजुरांना चिथावणी देताना पाहिलं होतं,” असंही तिनं नमूद केलं आहे. डेटा परत मिळवला जाऊ शकतो. परंतु हे सर्व छोटे खेळाडू आहेत.
कोणी केवळ कल्पनाच करून शकतो की या क्षेत्रात दहशतवाद किती आतपर्यंत आपली मुळे रोवून बसला आह आणि पैशासाठी भारताला कशाप्रकारे तोडत आहे. सरकारला सर्वांसाठीच एक चांगलं उदाहरण सादर करावं लागेल. ते दहशतवादासाठी देशाचे तुकडे करून विकू शकत नाहीत, जय हिंद,” असही कंगना म्हणाली.