अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोविड सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांची तपासणी करण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्या मुळे पारनेर तालुक्यातील चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर असे की, राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या डॉ. सचिन सोनवणे, डॉ. पुजा म्हस्के, डॉ. तेजश्री ढवळे, डॉ. आडसूळ यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघाही डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
तहसिलदार ज्योती देवरे यांनी तालुका वैदयकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांना नुकतेच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभुमिवर डॉ. सोनवणे, डॉ. म्हस्के, डॉ. ढवळे व डॉ. अडसूळ यांनी पूर्णवाद भवन येथे सुरू करण्यात आलेल्या
विस्तारीत डेडीकेटेड कोव्हीड सेंटर येथे भेटी देऊन रुग्णांच्या तपासण्या कराव्यात असे आदेश देण्यात आले होते. मात्र चारही डॉक्टर हे आदेश दिल्यानंतर तिकडे फिरकलेही नाहीत.
दि. २३ एप्रिल रोजी प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी पुर्णवाद भवन येथील विस्तारीत कोव्हीड सेंटरला भेट दिली, त्यावेळी हे डॉक्टर तेथे उपस्थित राहत नसल्याबददलचा शेरा प्रांताधिकारी भोसले यांनी दिला होता.
कोरोनाचे संकट वाढत असताना डॉक्टरांकडून हो असलेल्या हलगर्जीपणाविरोधात तहसिलदारांनी घेतलेल्या कठोर कारवाईमुळे वैद्यकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.