अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडी) एक अहवाल समोर आला यामध्ये जिल्हा गुन्हेगारीत एक नंबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांचे बळ कमी पडत आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने 2020 या वर्षाचे राज्यातील सर्वच जिल्ह्यांची गुन्ह्यांचे वर्गीकरण करून जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली आहे.
त्यामध्ये एका वर्षात 38 हजार 816 गुन्ह्यांची नोंद एकट्या नगर जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल होण्यात नगर जिल्हा अव्वल असल्याचे या आकडेवारीमध्ये समोर आले आहे.
त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, जळगाव, कोल्हापूरचा नंबर लागतो. राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा आहे.
जिल्ह्यात 45 लाखांहून अधिक लोकसंख्या असून कायदा सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात 30 पोलीस ठाणे कार्यरत आहेत. सुमारे तीन हजार 200 कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यामुळे जिल्ह्यात आणखी पोलीस ठाण्यांची आवश्यकता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस दलासाठी वाढीव 500 पोलीस कर्मचार्यांचा प्रस्ताव तयार करून नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मंजुरीने तो गृहविभागाकडे पाठविला आहे.