अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-गेल्या काही दिवसांपूर्वीच लाचखोरी प्रकरणात नगर जिल्ह्याने नकोस विक्रम करत बाजी मारली होती. यामध्ये सर्वाधिक लाचखोरीच्या प्रकरणामध्ये पोलीस विभव अव्वल राहिला तर त्यापाठोपाठ महसूल विभागाने बाजी मारली होती.
सरकारी विभागांच्या अशा प्रकरणामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यातील तीन लाचखोर पोलिसांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या तिघांवर निलंबनाची कारवाई केली होती.
कारवाई होत असली तरी पोलीस विभाग चपटा वसुली तसेच लाचखोरी सोडायला तयार नाही असेच दिसून येत आहे. विशेष बाबम्हणजे मागील पाच महिन्यांत जिल्ह्यातील आठ पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. यात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेतील पोलीस हवालदारास मागील आठवड्यात दारू विक्रेत्याकडून १५ हजार रुपयांचा हप्ता वसूल करताना लाचलुचपत विभागाने जेरबंद केले होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,
अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे स्वतः रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशा बिकट परिस्थितीतही पोलीस दलातील काहीजण निव्वळ वसुलीच्या मागे लागल्याने पोलीस दलाची प्रतिमा डागाळत आहे. अशा हप्तेखोरांवर पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी, अशीच मागणी जनतेतून होत आहे.