आषाढ महिन्यातच खवय्ये मांसाहारी पदार्थांवर तुटून पडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- करोना काळातील वाढती मागणी व मालाचा पुरवढा कमी, तसेच पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मटनाचे दरही वाढले आहेत. करोनाबाधित रुग्णांसाठी अंडी गुणकारी आहेत, असे सांगितले जात असल्याने मटनाबरोबरच अंड्यांनाही मोठी मागणी वाढली आहे.

यातच आषाढ महिन्यात मांसाहारी पदार्थांवर खवय्ये चांगलेच तुटून पडले आहेत. त्यामुळे मांस विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साहजिकच मागणी वाढली असल्याने मटन, मासे, अंडी यांचे भाव तेजीत आहेत.

श्रावण महिन्यात बहुसंख्य नागरिक मांसाहार करत नाही. त्यामुळे त्याआधी येणार्‍या आषाढ महिन्यातच मांसाहाराची हौस भागवून घेण्याचा अनेकांचा कल असतो. यातच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने बोकड्याचे व कोंबडीच्या मांसाचे दर चांगलेच वाढले आहेत.

मात्र खवय्यांकडून बाराही महिने मटनाला मोठी मागणी असते. सद्यस्थितीत बोकड्याचे मटन 640 रुपये प्रतिकिलो, तर कोेंबडीचे मांस 220 रुपये किलो दराने विकले जाते. अनेकजणांना माशांचे पदार्थ आवडत असल्याने तेही दराचा विचार न करता मासे खरेदी करतात.

अहमदनगर लाईव्ह 24