कांदा मार्केटमध्ये कांद्याची 65 हजार गोण्या आवक,प्रतिक्विंटल भाव मिळाला..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची जवळपास 65 हजार गोण्या (64 हजार 901) गोण्या आवक झाली होती.

भाव जास्तीत जास्त 2100 रुपयांपर्यंत निघाला. कांद्याच्या एक नंबरच्या मालाला 1700 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.

मध्यम मोठ्या मालाला 1500 ते 1600 रुपये, मध्यम मालाला 1400 ते 1500 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 700 ते 1300 रुपये

तर जोड कांद्याला 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. तीन-चार वक्कलला 2000 ते 2100 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

अहमदनगर लाईव्ह 24