मंत्री तनपुरेंच्या उपस्थितीत ‘त्या’ महत्वपूर्ण गोष्टीवर चर्चा होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली वांबोरी चारीच्या पाण्यासंदर्भात चिचोंडी येथील शिवनेरी मंगल कार्यालयात उद्या (दि. 27) दुपारी चार वाजता बठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे शेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर मुळा धरणातून वांबोरी चारीला 15 फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात आले.

काही अज्ञात शेतकर्‍यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्य पाईपलाईन फोडून पाणी पळवण्याचा प्रयत्न करडवाडी जवळ केला, अशाही घटना पुन्हा होऊ नयेत त्याचबरोबर ज्या लाभधारक तलावात पाणी पोहोचत नाही.

त्याबाबतही उपस्थित अधिकार्‍यांसोबत चर्चा करून मार्ग काढला जाणार आहे. यासह वांबोरी चारी टप्पा दोन बाबतही या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याने दोन्ही योजनांच्या लाभधारक शेतकर्‍यांनी शनिवारी दुपारी चार वाजता

चिचोंडी येथील बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन संभाजीराव पालवे, मोहनराव पालवे यांनी केले आहे.

आयोजित बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष अरुण आठरे पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांच्यासह मुळा पाटबंधारे विभागाचे प्रमुख अधिकारी व तसेच लाभधारक गावांतील सरपंच, उपसरपंच, लाभधारक शेतकरी उपस्थित असणार आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24