पावसात मुख्यमंत्री स्वत: कार चालवत पंढरपूरला रवाना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांचा ताफा दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पंढरपूरच्या दिशेने जाताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी कॅमेऱ्यात कैैद केला.

मुख्यमंत्री सोमवारी मध्यरात्री पंढरपूरच्या मंदिरामध्ये आषाढीच्या पुजेआधी होणाऱ्या पुजेसाठीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामधून रुक्मिणी मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ते २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होती. रात्री २.२० मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापुजेस ते उपस्थित राहतील.

त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने रावाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मागील वर्षी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले शासकीय पुजेसाठी उपस्थित राहिले होते.

त्यावेळी मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली होती. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते.

अहमदनगर लाईव्ह 24