अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे पुरण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून खून करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यास श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे.
वारंवार शरीरसुखाची मागणी केल्याच्या कारणावरुन हा खून केल्याचे समोर आले आहे.रमेश जाधव असे त्या मृत इसमाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी सुषमा रविंद गवाले रा.माळेगाव, बारामती हिच्यासह तेजस बाळासाहेब भोसले,
प्रशांत बजरंग साबळे, अमोल गोविंद कांबळे, रा. माळेगाव, राजेश विठ्ठल गायकवाड रा.माझगाव, सातारा या पाच आरोपीना अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
याबाबत सविस्तर असे की दि.८ फेब्रुवारी रोजी टाकळी कडेवळीत शिवारात शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. दरम्यान मयत रमेश जाधव व मुख्य आरोपी सुषमा गवाले यांची मागील काही दिवसांपूर्वी मॉर्निग वॉक करते वेळी भेट झाली होती.
भेटीतून दोघांचे मोबाईलद्वारे संभाषण सुरू झाले. त्यातच जाधव हा आरोपीकडे शरीरसुखाची मागणी करू लागला. याचा मनात राग धरून मुख्य आरोपीसह इतर चौघानी रमेश जाधव यास जमीन दाखविण्याच्या बहाण्याने टाकळी कडेवळीत शिवारात निर्जन ठिकाणी आले
येथे जाधव यांच्यावर सुरुवातीला गावठी कट्यामधून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला मात्र कट्यामध्ये गोळी अडकल्याने आरोपी राजेश गायकवाड याने हातातील कोयत्याने जोरदार वार करत मयत जाधव यांचे शीर धडा वेगळे केले.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीनी मयत जाधव यांचा मृतदेह पुरला. शीर सोबत घेउन जात अंबालिका कारखाना परिससरात पुरले. त्याच रात्री आरोपीनी मयताची गाडी पुणे- सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या एका घाटात लोटून दिली.