आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईने बलाढ्य मुंबईला हरवले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे 14 व्या सिजनच्या दुसऱ्या सत्राला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे.

आयपीएलची पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.

त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणकालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय़ घेतला. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ऋतुराजने एकाकी झुंज देत 156 धावांपर्यंत मजल मारली.

त्यानंतर आता मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. 157 धावांचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजी देखील ढेपाळली.

मुंबईचे सलामीवीर काही खास कामगिरी करू शकले नाहीत. तर ईशान किशन आणि कर्णधार कायरन पोलार्ड देखील काही खास कामगिरी करू शकले नाहीत. तर चेन्नईकडून दिपक चहरने 2 तर ड्वेन ब्रावोने 3 गडी बाद केले आहेत.

त्यामुळे मुंबईला केवळ 136 धावा करता आल्या आहेत. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे. दरम्यान, या सामन्यात ऋतुराज गायकवाड यांची फलंदाजी खास राहिली. त्याने अखेरपर्यंत चेन्नईची खिंड लढवली. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी देखील भेदक गोलंदाजी केली होती.

Ahmednagarlive24 Office