राज्यात एवढ्या जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण, अहमदनगरचा चौथा क्रमांक

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News:राज्यात आजपर्यंत २६६४ जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झाली आहे. सर्वाधिक ६३६ जनावरे अकोला जिल्ह्यात असून अहमदनगर जिल्ह्यात २७७ जनावरांना या रोगाची बाधा झाली आहे.

राज्यातील ३३८ गावांमध्ये ही बाधित जनावरे आढळली असून आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

हा रोग नवीन नाही. महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जणावरांना याची लागण झाली होती.

त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता. सध्या या आजारावरील १६ लाखाहून अधिक लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचबरोबर अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होणार आहेत.

जिल्हानिहाय बाधित जनावरे

जळगाव: ५१२

अहमदनगर: २७७

धुळे: ७९

अकोला: ६३६

पुणे: २०३

लातूर: १०२

औरंगाबाद: ३२

बीड: २३

सातारा: ५५

बुलढाणा: २३३

अमरावती: ३७८

उस्मानाबाद: ९

कोल्हापूर: २५

सांगली: २३

यवतमाळ: ९

परभणी: २०

सोलापूर: १०

वाशीम: २०

नाशिक: १०

जालना: ७

पालघर:१

Ahmednagarlive24 Office