ताज्या बातम्या

शेअर बाजारात ‘या’ स्टॉक्सने 5 दिवसात दिला 40 टक्क्यांपर्यंत परतावा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :-शेअर मार्केटमध्ये सध्या चढउतार सुरु आहे. मात्र या परिस्थिती अनेक कंपन्या चांगला परतावा देत आहे. आज आपण सर्वाधिक परतावा देणार्‍या टॉप 5 बद्दल जाणून घेऊ. जास्त परतावा देणारे दोन स्टॉक साखर उद्योगाचे आहेत.

ओरॅकल क्रेडिट लि : या स्टॉकने गेल्या आठवड्यात 52.17 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. हा शेअर गेल्या आठवड्यात 41.4 रुपयांवर बंद झाला, तर काल संपलेल्या आठवड्यात तो 63 रुपयांवर बंद झाला.

गेल्या आठवड्यात कोणी या स्टॉकमध्ये 1,00,000 ची गुंतवणूक केली असेल, तर या आठवड्याच्या अखेरीस ते 1,52,000 रुपये झाले असते. चोठानी फूड्स लि : हा स्टोक एका आठवड्यात 40.47 टक्के परतावा या शेअर दिला.

गेल्या आठवड्यात चोठानी फूड्स लिमिटेडचा शेअर 11.39 रुपयांवर बंद झाला, तर या आठवड्यात 16 रुपयांवर बंद झाला. जर एखाद्याने गेल्या आठवड्यात या स्टॉकमध्ये 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत ते 1,40,000 रुपये झाले असते.

टेक सोल्युशन्स लि : या शेअरने या आठवड्यात 38.46 टक्के परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात या शेअरने 27.3 रुपयांवर क्लोजिंग दिली होते, तर या आठवड्यात 37.8 रुपयांवर बंद झाला आहे.

द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लि : द्वारिकेश शुगरने 11 मार्च 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात 36.02 टक्के परतावा दिला आहे.

गेल्या आठवड्यात या स्टॉकचा क्लोजिंग 94.95 वर झाला होता, तर या आठवड्यात या स्टॉकने 129.15 रुपयांवर झेप घेतली आहे.

उगर शुगर वर्क्स लि : उगर शुगरचा स्टॉक या आठवड्यात 64.05 रुपयांवर बंद झाला आहे, तर गेल्या आठवड्यात हा स्टॉक 47.95 रुपयांवर बंद झाला होता. दोन्ही आठवड्यांच्या किमतीत 33.58 टक्के फरक आहे.

Ahmednagarlive24 Office