Israel News:गेल्या काही वर्षात जगभरात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्याही अपग्रेट होत नवनवीन तंत्र आणत आहेत.
शिवाय इंटरनेटसेवाही अधिकाधिक स्वस्त देण्याची स्पर्धा सुरू आहे. जगात सर्वत्र यांचे दर भिन्न आहेत. एका अहवालानुसार इस्त्रायलमध्ये सर्वात स्वस्त म्हणजे ३ रुपयांत एक जीबी दराने इंटरनेट उपलब्ध आहे.
तर सेंट हेलेना या देशात सर्वांत महाग इंटरनेट आहे. तेथे १ जीबीसाठी तब्बल साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात. तुलनेत आपल्या देशातील इंटरनेटचे दर किती तरी स्वस्त आहे.
२३३ देशातील १ जीबी मोबाइल डेटासाठीच्या दरांची तुलना करण्यात आली आहे.
यानुसार इस्त्रायलमध्ये सर्वात स्वस्त इंटरनेट उपलब्ध आहे. येथे १ जीबी डेटासाठी फक्त ०.०४ डॉलर्स (जवळपास ३ रुपये) खर्च येतो. तर दक्षिण अटलांटिक महासागरातील एक क्षेत्र असलेल्या सेंट हेलेनामध्ये १ जीबीसाठी सर्वाधिक ४१.०६ डॉलर्स (जवळपास ३,५०० रुपये) खर्च करावे लागतात.
वर्ल्डवाइड मोबाइल डेटा प्राइसिंग लिस्ट २०२२ ही Cable.co.uk द्वारे तयार करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, इस्त्रायल, इटली, सॅन मॅरिनो, फिजी आणि भारत हे मोबाइल डेटा सर्वात स्वस्तात उपलब्ध असलेले टॉप-५ देश आहेत. भारत या लिस्टमध्ये ५व्या स्थानावर असून, यूजर्सला १ जीबी मोबाइल डेटासाठी ०.१७ डॉलर (जवळपास १४ रुपये) खर्च करावे लागतात.