ताज्या बातम्या

‘या’ ठिकाणी नगरसेवकांनी केले चक्क पथदिव्यांच्या प्रकाशाचे मोजमाप!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- आतापर्यत एखादा दिव लावल्यानंतर त्याचा प्रकाश किती व कसा पडतो याबाबत फरशी र्चा केली जात नव्हती मात्र आता नगरमध्ये महापालिकेच्यावतीने

शहरातील विविध भागात बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट एलईडी दिव्यांच्या प्रकाशाचीच मोजणी करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

काही दिवसापासून स्मार्ट एलईडी पथदिव्यांच्या प्रकाशावरून शहरात उलट सुलट चर्चा चालू होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले व आयुक्त शंकर गोरे यांनी बैठक घेऊन

ठेकेदाराला जुन्या लाईटच्या प्रकाशाप्रमाणे नवीन स्मार्ट एलईडीचा प्रकाश देण्याच्या सूचना व करार नाम्यानुसार काम करण्याचे संबंधित ठेकेदारास आदेश दिले होते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचे विद्युत विभागा प्रमुख व नगसेवक,ठेकेदार एजन्सीचे अधिकारी कर्मचारी यांनी पाईपलाईन रोडवर सुरु असलेल्या जुन्या पथदिव्यांची प्रकाशाची मोजमाप घेतली.

आज पुन्हा स्मार्ट एलईडी पथदिवे बसवल्यानंतर या दिव्यांच्या प्रकाशाचे मोजमाप करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वत्र स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहे, असे विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office