अहमदनगर जिल्ह्यातील या गावी बहिणीऐवजी भाऊच पाहतोय सरपंचाचा कारभार ! अखेर गुन्हा दाखल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- अकोले तालुक्यातीळ पिंपळदरावाडी गावात महिला सरपंच आपली बहीण असल्याने व ती बाहेर गावात रहात असल्याचे कारण पुढे करून महिला सरपंचाचा भाऊ साहेबराव भगवंता भांगरे हा ग्रामपंचायत सदस्य असून शासकीय अमृत आहार योजनेचे आलेले पैसे आंगणवाडीच्या कामासाठी देत नाही.

ग्रामपंचायतीत ग्रामविकास कामात हस्तक्षेप करून बहीण सरपंच असताना हा भाऊच बहिणीच्या नावे कारभार पहात धनादेशावर खोट्या सह्या करून पैसे काढतोय. मला नेहमी त्रास देऊन मारहाण करतोय, अशी फिर्याद आदिवासी पिंपळदरावाडी येथील अंगणवाडी सेविका चहाबाई पांडुरंग भांगरे यांनी दिली आहे.

बुधवारी थेट राजूर पोलिस ठाणे गाठून पोलिसांपुढेच आपली कैफियत मांडून न्याय मिळण्याची मागणी केली. हकिगत समजावून घेतल्यावर चहाबाई पांडुरंग भांगरे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिस ठाण्यात आरोपी साहेबराव भगवंता भांगरे याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आदिवासी पिंपळदरावाडी सरपंच अंजनाबाई भांगरे टाकेद, तालुका ईगतपुरी येथे राहतात. तर त्यांचा भाऊ साहेबराव भगवंता भांगरे सदस्य आहे. मात्र भाऊच बहिणाबाईच्या अनुपस्थितीत चक्क सरपंच म्हणून काम करीत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24