file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- नगर शहराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या डीबीएफएमएमओ तत्त्वावरील स्मार्ट एलडी दिवे बसवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार शहर उजळून टाकण्यासाठी सध्याच्या दिव्यांच्या प्रकारानुसार सुमारे दरमहा ७० लाखांचा खर्च आहे.

परंतु, स्मार्ट एलईडीमुळे दरमहा १३ लाखांची बचत होऊन तीन महिन्यांनी संपूर्ण शहर उजळणार आहे. महापालिकेत सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. त्यात सुमारे २९ विषयांवर चर्चा झाली. त्यात महत्वपूर्ण स्मार्ट एलईडीच्या विषयाकडे नगरकरांचे लक्ष होते.

हा विषय समितीत मंजूर करण्यात आला आहे. महानगर पालिकेने डीबीएओएमएमटी तत्त्वावर स्मार्ट एलईडी पथदिवे बसवणे व सात वर्षांसाठी देखभाल दुरूस्ती करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. शहरात ३० टक्के दिवे बंद असताना सध्या ५६ लाख ९१ हजार ५२७ रुपये दरमहा खर्च येतो.

सर्व दिवे सुरू राहिल्यास हा खर्च ७० लाख ३ हजारांवर आहे. परंतु, नव्याने स्मार्ट दिवे बसवल्यास सर्व दिवे सुरू राहूनही मनपाला जीएसटीसह ५६ लाख ९३ हजार ४१४ रूपये खर्च येणार आहे. कार्यारंभ आदेशानंतर तीन महिन्यांचा कालावधी शहर उजळण्यासाठी लागेल.